महाराष्ट्र

राज्यात ग्रामसेवक पदासाठी नोकर भरतीचे वेळापत्रक जाहीर…!

मुंबई: ग्रामसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांच्या तब्बल 10,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, या भरतीसाठीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत गट-‘क’मधील सर्व संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. (वाहनचालक व गट- ‘ड’ संवर्गातील पदे वगळून). ही मान्यता वित्त विभागाच्या निर्देशानुसार 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू असेल. त्यानंतरची भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या शासन निर्णय 30 सप्टेंबर 2022 नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येईल.

जिल्हा परिषदेतील गट-‘क’मधील रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून भरली जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक…

1 ते 7 फेब्रुवारी 2023 – पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.

22 फेब्रुवारी 2023 – उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.

23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 – अर्जाची छानन

2 ते 5 मार्च 2023 – पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

6 ते 13 एप्रिल 2023 – पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जाईल.

14 ते 30 एप्रिल 2023 – ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होईल.

1 मे ते 31 मे 2023 – अंतिम निकाल व पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago