तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात केले होते खरेदीखत
शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे एका सैनिकाच्या पत्नीला खरेदीखत करुन देत विक्री केलेल्या शेतजमिनीची महिलेच्या परस्पर अन्य व्यक्तीला विक्री करुन फसवणूक करत महिला सदर शेतात गेली असता महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सदाशिव देवराम शिंगाडे, सीताबाई लालू शिंदे, राधाबाई रामचंद्र कोळपे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वरुडे (ता. शिरुर) येथील सेवानिवृत्त सैनिकाची पत्नी असलेल्या सारिका शिंगाडे यांनी गावातील सदाशिव शिंगाडे, सिताबाई शिंदे, राधाबाई कोळपे यांच्याकडून जमीन विकत घेतली होती त्या जमिनीचा मोबदला देखील त्यांना देऊ करत त्याबाबतचे खरेदीखत सुद्धा दुय्यम निबंधक कार्यालय तळेगाव ढमढेरे येथे केलेले होते. मात्र त्यांच्या जमिनी गटामध्ये हिस्सा असलेले दगडू माने हे मयत असल्याने त्यांच्या वारसांची ननोंद झालेली नसल्याने सदर जमिनीतील माने यांच्या हिस्स्याचे खरेदीखत झालेले नव्हते.
मात्र सारिका शिंगाडे यांनी चावडी ॲपवर त्यांच्या जमिनीच्या नोंदणीची पाहणी केली असता सारिका शिंगाडे यांनी खरेदी केलेली जमीन सदाशिव शिंगाडे व अन्य दोघांनी पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला शिरुर दुय्यम निबंधक कार्यालय येथे विक्री केल्याचे दिसून आल्याने सारिका शिंगाडे यांनी शिरुर येथे जात त्याबाबतचे कागदपत्र काढून घेतले. त्यानंतर सारिका या त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीत गेल्या असता सदाशिव शिंगाडे यांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत आधी नोंद लावून ए नाहीतर हातपाय तोडील अशी धमकी दिली.
याबाबत सारिका सीताराम शिंगाडे (वय ५२) रा. शिंगाडवाडी वरुडे (ता. शिरुर) जि. पुणे सध्या रा. साई सत्यम पार्क वाघोली ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सदाशिव देवराम शिंगाडे रा. शिंगाडवाडी वरुडे (ता. शिरुर) जि. पुणे, सीताबाई लालू शिंदे रा. शिंदेवाडी मलठण (ता. शिरुर) जि. पुणे, राधाबाई रामचंद्र कोळपे रा. हिंगणी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरलेल्या चिंचणी (ता.…
पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…
थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…
मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…
शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…
अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…