नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली असून, जिल्हाध्यक्षांपासून ग्रामपातळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी दिली.
दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या बैठकीत जिल्हा व तालुका पातळीवरील नेतृत्वावर सविस्तर चर्चा झाली. पारदर्शक पद्धतीने जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात आली असून, काही नव्या चेहऱ्यांना प्रदेश पातळीवरही संधी दिली जाणार आहे.
राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाअंतर्गत ब्लॉक अध्यक्ष, सेवादल, एससी, एसटी, ओबीसी विभागांतही नवीन नियुक्त्या होतील. एकूण सुमारे ७ हजार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असून, महिला, मागासवर्गीय, तरुण तसेच अनुभवी कार्यकर्त्यांना समान संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, Dhirendra Shastri यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत सपकाळ यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. छत्रपती Shivaji Maharaj यांच्या इतिहासाची विकृत मांडणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या संदर्भात मुख्यमंत्री Devendra Fadnavis, केंद्रीय मंत्री Nitin Gadkari आणि सरसंघचालक Mohan Bhagwat यांच्या उपस्थितीत झालेल्या वक्तव्यांवर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी या विषयावर मौन बाळगल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत होत असलेल्या कथित अपमानावर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…