महाराष्ट्र

ठाकरेंना दिलासा! शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान

पालिका निवडणुकीआधीच महत्वपूर्ण निकाल

मुंबई: मागील अनेक महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात रखडलेल्या शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाने थेट ऑगस्ट महिन्यात याबाबत सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले, असे असले तरी कोर्टाने केलेल्या विधानामुळे या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लागण्याची शक्यता वाढली आहे.

सुप्रीम कोर्टात न्यायाधीश सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यापासून एकनाथ शिंदे यांना रोखावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी ही मागणी केली आहे.

याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी ठाकरेंच्या वकिलांनी 2 जुलैला खंडपीठासमोर केली होती. त्यावर आज कोर्टात युक्तीवाद होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायाधीश सूर्यकांत यांनी ऑगस्ट महिन्यांत हे प्रकरणावर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. मात्र, अद्याप त्यांनी तारीख निश्चित केलेली नाही. आजच्या सुनावणीदरम्यान सूर्यकांत यांनी ही केस आपल्याला संपवायची आहे, असे विधान केले आहे.

सुप्रीम कोर्टाकडून ऑगस्ट महिन्यात या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे संकेत दिल्याने उद्धव ठाकरे यांना सध्यातरी तात्पुरता दिलासा मिळाला आहे. निवडणुकीआधी संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागू शकतो. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या 2022 मधील बंडानंतर फेब्रुवारी 2023 मध्येच शिंदे यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले होते. त्याला ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून अजूनही त्यावर निकाल आलेला नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

2 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

3 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

3 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

3 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

3 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

3 तास ago