महाराष्ट्र

व्यापारी आणि नागरिकांनो सावधान! ‘ही’ चूक केल्यास भरावा लागेल ५ हजारांचा दंड

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरकरांनो, सावध व्हा! शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. दुकानासमोर डस्टबिन न ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता थेट 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात तर येणारच आहे, पण सार्वजनिक ठिकाणी, दुभाजकात किंवा चौकात कचरा फेकणाऱ्यांवरही जबर दंड आकारला जाणार आहे.

डस्टबिन नसेल तर दंडात्मक कारवार्ड

शहरातील प्रत्येक त्याच्या दुकानासमोर डस्टबिन न ठेवल्यास व्यावसायिकांना 5,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. ही कारवाई थेट केली जाणार असून कोणतीही तडजोड नसेल.

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांनाही नाही सूट

रस्त्यावर, दुभाजकावर किंवा चौकात कचरा टाकणाऱ्यांवरही महापालिका थेट दंड आकारणार आहे.

सिंगल युज प्लास्टिक’ पूर्णपणे बंद

महापालिकेने पर्यावरण रक्षणासाठी सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असून, दुकानदारांनी पर्यावरणपूरक पर्याय वापरण्याचे आवाहन केले आहे.

स्वच्छता निरीक्षक आणि नागरी मित्रांचा कडक पाहणी मोर्चा सुरू

महानगरपालिका उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवली जात असून शहरातील १० झोनमध्ये स्वच्छता निरीक्षक आणि नागरी मित्र (माजी सैनिकांचा समावेश) पथक सक्रिय झाले असून, नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ दंड ठोठावले जात आहेत.

शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे.

डस्टबिन वापरा, कचरा जागच्या जागीच टाका आणि प्लास्टिकला ‘नाही’ म्हणूया आपलं शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेऊया.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

5 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

5 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

5 तास ago