संभाजीनगर: २ मे रोजी रात्री सव्वा 10 वाजता समृद्धी महामार्गावरील नाथ नगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. चैताली व डॉ. श्रावण शिंगणे या दांपत्यासमवेत त्यांच्या आईसोबत लग्नासाठी म्हणून १ मे रोजी आधी शेलगाव देशमुख (ता. मेहकर) व लग्न गाव असलेले पोखरी फाटा शिवाजीनगर येथे गेले होते. तेथून परत मेहकर येथे आले होते.
२ मे रोजी रात्री बोईसर कडे परतत असताना अचानक त्यांच्या कारसमोर एक गाडी आली आणि “आम्ही इन्शुरन्सवाले आहोत” असे सांगत तिघे अज्ञात लुटारे खाली उतरले. त्यांनी शिंगणे कुटुंबाच्या कारची चावी काढून घेतली आणि डॉ. श्रावण यांना मारहाण करून डॉ. चैताली आणि त्यांच्या आई मीना निंभोरे यांच्याजवळील साडे 14 तोळ्यांचे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले गेले.
दागिन्यांची यादी
1.5 तोळ्याचे मंगळसूत्र
4 तोळ्याची मोठी पोत
2 तोळ्याचा लक्ष्मी हार
2 तोळ्याची छोटी पोत
5 तोळ्याची मोठी पोत
डॉ. चैताली या लुटीचा व्हिडिओ मोबाईलवर रेकॉर्ड करत होत्या, पण लुटारूंनी मोबाईल फोडून पुरावेही नष्ट केले.
३ मे रोजी त्यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या अज्ञात तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस तपास सुरु आहे.
सावधान नागरिकांनो
समृद्धी महामार्गावर प्रवास करताना सतर्क राहा.
एकटे प्रवास टाळा.
अनोळखी व्यक्तींकडून मदत न घेता पोलिसांना संपर्क करा.
गाडीमध्ये मौल्यवान वस्तू ठेऊ नका.
GPS लोकेशन ऑन ठेवा.
जवळच्या व्यक्तींना तुमचा रूट शेअर करा.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…