CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), default quality?
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित केले असून सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.
अपघातातील तांत्रिक बाबींवर शंका
रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्सची स्थिती, विमानात अतिरिक्त इंधन होते का, अपघाताच्या शेवटच्या क्षणी ट्रान्सपॉन्डर बंद का झाला, मुख्य वैमानिकाचा आवाज का गायब झाला, तसेच संबंधित विमान कंपनीची पार्श्वभूमी काय आहे, यासारखे प्रश्न उपस्थित केले.
यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून या दुर्घटनेत वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली आहे.
राजकीय वारसा असूनही वेगळी वाट
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे असलेले रोहित पवार यांनी राजकीय वारसा लाभला असला तरी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
२०१७ मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या शिर्सुफळ गटातून निवडणूक जिंकत त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर २०१९ मध्ये बारामतीसारखा सुरक्षित मतदारसंघ टाळून नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड हा भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ निवडला. तत्कालीन मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. २०२४ मध्ये ते सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले.
‘युवा संघर्ष यात्रा’मुळे राज्यभर ओळख
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी ncp (शरद पवार faction) गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पक्ष अडचणीत असताना त्यांनी ८०० किलोमीटरची ‘युवा संघर्ष यात्रा’ काढून पुणे, मराठवाडा आणि विदर्भात युवकांशी संवाद साधला.
बेरोजगारी, कंत्राटी भरती, पेपरफुटी यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. या यात्रेमुळे अभ्यासू, संयमी; पण आक्रमक नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली.
पवार कुटुंबाचा पुढचा चेहरा?
अजित पवार यांच्या निधनानंतर कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना रोहित पवार पुढे येताना दिसत आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात सक्रिय उपस्थिती आणि युवकांशी असलेली जवळीक यामुळे ते युवा नेतृत्व म्हणून पुढे सरसावत आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय वारशाला पुढे नेणारे तरुण नेतृत्व म्हणून रोहित पवार यांच्याकडे राज्याच्या राजकारणात आता विशेष लक्ष लागले आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…