महाराष्ट्र

सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा! राष्ट्रवादी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जबर हाणामारी

लातूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत घुसखोरी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सुनील तटकरेंवर पत्ते उधळत निषेध नोंदवला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामुळे संपूर्ण लातूर शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार सुनील तटकरे लातूरमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी आले होते. त्याचवेळी छावा संघटनेचे काही कार्यकर्ते अचानक सभागृहात शिरले. त्यांनी पत्ते उधळून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा निषेध नोंदवला. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. माणिकराव कोकाटे हे काही वर्षांपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीकडे आलेले वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ते सभागृहात पत्ते खेळताना दिसत आहे

छावा संघटना ही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भूमिकांवर नाराज आहे. त्यामुळे संघटनेने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सुनील तटकरेंसमोरच निषेध केला आहे. छावा संघटनेच्या घोषणांनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले. दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. हाणामारी सुरू झाली. लाथाबुक्यांचा वर्षाव झाला, काही जणांनी खुर्च्याही फेकल्या.

यामध्ये राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेनंतर लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटांना वेगळं केलं. सध्या या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. दोन्ही गटांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर लातुरातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेमध्ये आधीपासूनच असलेला वाद आता उघडपणे समोर आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अकरावीचे ऑफलाईन प्रवेश करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा

मुंबई राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच करणे बंधनकारक आहे. मंजूर…

2 तास ago

खासगी शिकवणी केंद्रांच्या कायद्याला १५ सप्टेंबरपर्यंत हरकतींची मुदतवाढ; आतापर्यंत ११ हजारांहून अधिक सूचना

मुंबई : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्यावर राज्यभरातून मोठ्या…

2 तास ago

गणेशोत्सव केवळ आरास-रोषणाईपुरता नको; समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे; एकनाथ शिंदे

ठाणे : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक…

2 तास ago

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सात-आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

शिरुर (तेजस फडके): अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तसेच धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाने…

13 तास ago

शिक्रापुर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेसह धडाकेबाज कारवाई; महाराष्ट्र-मध्यप्रदेशात घरफोड्या करणारा सराईत चोर जेरबंद

तीन घरफोडीचे गुन्हे उघड, आरोपीविरुद्ध यापूर्वी १४ गुन्हे दाखल; १६ तोळे सोन्यासह २४ लाख ३०…

13 तास ago

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

1 दिवस ago