५०० कार्यकर्त्यांचाही शिंदे गटात प्रवेश
मुंबई: महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असून, सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाआघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत दिसत असतानाच, शिवसेना शिंदे गट अधिक बळकट होताना दिसतो आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी महायुती तसेच महाआघाडीनं जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत दिसत असतानाच, शिवसेना शिंदे गट अधिक बळकट होताना दिसतो आहे. कारण ठाकरे बंधूंच्या दोन महत्त्वाच्या शिलेदारांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. अंधेरीतील झायलो सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
अंधेरी पूर्व मतदारसंघातील झायलो सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नगरसेवकांसह आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यामातून विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही धनुष्यबाण हाती घेतलंय. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाचे अधिक बळ वाढलं आहे.
यावेळी ठाकरे गटाचे माजी नगरसेविका सुनिता इलावडेकर यांनी मशालची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतलंय. त्यांचा आज पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मनसेचे माजी नगरसेवक अविनाश सावंत यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे मनसे आणि ठाकरे गटाला धक्का बसला असून, मुंबईत शिवसेना शिंदे गटाचं बळ वाढलं आहे.
यावेळी इतर पक्षातील ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनीही शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करत पक्षाची ताकद वाढली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव
शिवसेनेच्यावतीने दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी तसेच “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत जनतेपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा विशेष कार्यक्रम नेस्को सेंटर, गोरेगाव येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदासभाई कदम, खासदार रविंद्र वायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. तसेच विविध शासकीय दाखले वाटप देखील करण्यात आले.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…