महाराष्ट्र

सचिन तेंडुलकर यांची एकनाथ शिंदे यांना ‘नंदनवन’ येथे सदिच्छा भेट; अर्जुनच्या विवाहाचे निमंत्रण

 

मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर (sachin Tendulkar) यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सचिन यांच्या पत्नी  अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) देखील उपस्थित होत्या.

सचिन तेंडुलकर यांनी आपल्या ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन यांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली. अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात झालेल्या या भेटीत दोन्ही मान्यवरांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

विशेषतः राज्यातील क्रीडा सुविधा, युवा खेळाडूंना उपलब्ध होत असलेल्या संधी आणि क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सचिन तेंडुलकर यांना दिली. या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक संवाद सुरू ठेवण्याची भूमिका दोघांनी व्यक्त केली.या भेटीमुळे क्रीडा आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

6 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

8 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

8 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

8 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

8 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

8 तास ago