महाराष्ट्र

सह्याद्री हॉस्पिटलची जागा ना विकता येणार ना भाड्याने देता येणार, 6400 कोटींचा व्यवहार अडचणीत

पुणे: पुण्यातील मोठी रुग्णालय साखळी असलेलं सह्याद्री हॉस्पिटल्सची विक्री हा सध्या राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील चर्चेचा विषय आहे. भारतातील आघाडीची रुग्णालय साखळी असलेल्या मणिपाल हॉस्पिटल्सने ही खरेदी केली आहे. हा संपूर्ण व्यवहार 6,400 कोटी रुपयांना झाल्याची माहिती आहे.

देशातील वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या व्यवहारांपैकी एक असलेला हा व्यवहार आता अडचणीत सापडलाय. पुणे महानगरपालिकेने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट म्हणजेच सह्याद्री हॉस्पिटलला याबाबत नोटीस पाठवली आहे.

सह्याद्री हॉस्पिटलने मणिपाल हॉस्पिटलसोबत जो करारनामा केलाय त्याबाबतचे सर्व पत्र आणि जागेबाबतची काही पत्र असल्यास आणि महापालिका आयुक्तांची परवानगीची प्रत हे देण्यास बंधनकारक आहे. त्यासोबतच 56 लाख 35 हजार 200 रुपयांचे प्रीमियम पुढील 7 दिवसांमध्ये देणे बंधनकारक असल्याचं या नोटीशीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. त्या जागेसंदर्भात काही व्यवहार असतील तर ते महापालिका आयुक्तांच्या परवानगी शिवाय होऊ शकणार नाहीत, असंही या नोटीशीमध्ये स्पष्ट करण्यात आल आहे.

काय आहे नोटीस?

पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन कार्यालयाने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला एक पत्र पाठवले आहे. या पत्राचा विषय पुणे पेठ, एरंडवणे येथील फायनल प्लॉट नंबर 30 (Final Plot No. 30) येथील जागेच्या भाडेपट्ट्याबाबत आहे. हा प्लॉट नंबर 30, जो 1976 चौरस मीटर (1976 sq. mt.) क्षेत्राचा आहे, तो कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला 99 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आला आहे. यासाठी ट्रस्टने 53,35,200 रुपये (INR 5,335,200) प्रीमियम आणि प्रति वर्ग मीटर (per sq. mt.) 1 रुपया (INR 1) असे भाडे भरणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आणि कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्यात 27 फेब्रुवारी 1998 रोजी एक भाडेकरार (lease agreement) रजिस्टर करण्यात आला होता आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक आहे.

या करारानुसार, भाडेपट्ट्याने दिलेली जागा किंवा तिचा कोणताही भाग तसेच या जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा कोणताही भाग इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला भाड्याने, पोटभाड्याने किंवा अन्य कोणत्याही प्रकारे देता येणार नाही. मात्र, हॉस्पिटल योग्य रीतीने चालवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य संस्था किंवा कंपनीसोबत करारनामा करण्यास सवलत राहील असे नमूद आहे. तसेच, ही जागा इतर कोणालाही गहाण, दान , बक्षीस, इजमेंट किंवा इतर कोणत्याही जडजोखमीत गुंतवता येणार नाही. जर हॉस्पिटलच्या इमारतीच्या बांधकामासाठी जमीन राष्ट्रीयीकृत बँक , सहकारी बँककिंवा अन्य कोणत्याही वित्त संस्थेकडे गहाण ठेवावयाची असेल, तर त्यासाठी महापालिका आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

सध्याच्या परिस्थितीत विविध वर्तमानपत्रांमध्ये सह्याद्री हॉस्पिटलने (Sahyadri Hospital) परस्पर मदर रुग्णालय मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुपला (Manipal Hospitals Group) हस्तांतरित केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या संदर्भात, कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टने सह्याद्री हॉस्पिटलसोबत (Sahyadri Hospital) केलेला सामंजस्य करार 30 सप्टेंबर 2006 रोजी झाल्याचे दिसून येते.

पुणे महानगरपालिकेने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospital) आणि मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुपसोबत (Manipal Hospitals Group) केलेल्या कराराची प्रत, तसेच जागा कोणत्याही वित्त संस्थेकडे गहाण किंवा तारण ठेवली असल्यास त्यासंबंधीचे दस्तऐवज आणि त्यासाठी महापालिका आयुक्तांची (Municipal Commissioner) परवानगी घेतली असल्यास तिची छायांकित प्रत, तसेच पुणे महानगरपालिकेच्या कोषागारात संपूर्ण प्रीमियम रक्कम भरल्याच्या पावत्यांची प्रत पुढील 7 दिवसांत सादर करण्याची विनंती केली आहे. वसुंधरा बारवे (Vansudhara Barve), उपायुक्त, मालमत्ता व व्यवस्थापन, पुणे महानगरपालिका यांनी हे पत्र 16 जुलै 2025 रोजी पाठवले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

6 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

6 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

8 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

8 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

1 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

1 दिवस ago