महाराष्ट्र

अंबादास दानवे ‘तुम्ही पुन्हा या’, पण…

मुबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांच्या शेवटच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टोलवाटोलवी झाल्याचं दिसून आलं. एकनाथ शिंदे यांच्या समोरच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली.

तर दुसरीकडे अंबादास दानवे यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. अंबादास दानवे तुम्ही पुन्हा या, पण याच पक्षातून या असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर मी देवेंद्र फडणवीसांप्रमाणे पुन्हा येईन, पण कुठून येईन ते मात्र विचारू नका असं मिश्कील वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे

अंबादास दानवे यांची टर्म संपली असं मी म्हणणार नाही. तुमची पहिली टर्म पूर्ण झाली आहे. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ असं जोरात म्हणा. पण ते याच पक्षातून असंही म्हणा असं उद्धव ठाकरे म्हणाले. अंबादास दानवे यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीच्या समाप्तीनंतर त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून ऑफर येण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केल्याची चर्चा सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांना टोला

त्या आधी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले होते की, अंबादास हा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही. तोच संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी टोमणा मारला. ते म्हणाले की, अंबादास दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. पण त्यांनी भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली नाही. समोरच्या ताटात काही चांगलं दिसलं म्हणून तिथे गेला नाहीत.

पदं येतात आणि पदं जातात, पण जनतेच्या मनात आपली काय प्रतिमा राहते हे महत्वाचं. असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, “गेल्या आठवड्यात अंबादास माझ्या घरी आले होते. त्यावेळी टर्म संपतेय, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही असं मी त्यांना म्हणालो. पण आतापर्यंत जे दिलंय ते खूप दिलंय असं अंबादास म्हणाले.

मुख्यमंत्री माझे आभार मानू शकणार नाहीत

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपच्या आणि संघाच्या मुशीत घडलेला असा अंबादास दानवे हा कार्यकर्ता भाजपने आम्हाला दिला याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. मात्र ते माझे आभार मानू शकतील की नाही याबद्दल शंका आहे. कारण त्यांनी माझ्याकडून घेतलेले नेते हे वेगळेच आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

6 तास ago