महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या त्या पोस्टवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया म्हणाले..

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठी विजयी मेळाव्यानंतर सातत्याने युतीबद्दल चर्चा होत आहेत. मात्र, अद्यापही ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चाबाबत संभ्रम आहे. याच दरम्यान, राज ठाकरे यांनी इगतपुरी येथे झालेल्या त्यांच्या पक्षाच्या शिबिरात पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाणार असल्याचे विधान केले असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

यावर आपण असे काहीच बोललं नसल्याचे राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी माध्यमांच्या वार्तांकनावर संतप्त प्रतिक्रिया दिली. अशातच आता राज ठाकरे यांच्या पोस्टवर उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक प्रतक्रिया दिली आहे.

मुंबईत झालेला मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता, असे विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. यासंबंधी काही माध्यमांनी वृत्त देखील दिले. यानंतर आता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घातले”, असा आरोप केला आहे.

त्यांच्या पोस्टनंतर आता संजय राऊत यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात सातत्याने प्रश्न विचारण्यापेक्षा महापालिका निवडणुकीनंतर काय होतं ते तुम्हाला दिसेल. राज ठाकरे यांची एक मी पोस्ट वाचली. ती वाचल्यावर त्यातले अर्थ आणि संदर्भ तुम्हाला कळायला हवे, असे सूचक विधान केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

3 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

3 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

3 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

3 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

4 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

4 तास ago