छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील घटना…
औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी आज पंचायत समिती कार्यालया फुलंब्रीसमोर तब्बल दोन लाख रुपयांची उधळण करीत शेतकऱ्यांसाठी न्याय मागितला असून पंचायत समितीमध्ये दाखल विहिरीचा प्रस्ताव मंजूर करताना 12 टक्के रक्कम मागितली जाते असा आरोप त्यांनी यावेळी केला.
पंचायत समिती कार्यालयात शेतकऱ्यांना सिंचन विहीर, जनावरांचा गोठा, पाणंद रस्ता अशा कामांच्या मंजुरीसाठी टक्केवारीच्या हिशोबाने शेतकऱ्याची आर्थिक लूट केली जात आहे. विहिरी प्रस्ताव मंजुरीसाठी देखील शेतकऱ्यांकडे १२ टक्के कमिशन मागण्यात आले आहे, असा आरोप करीत संतापलेल्या सरपंच साबळे यांनी पंचायत समिती समोर गळ्यातील हार घालून नोटांची उधळण करीत आंदोलन केले.
याबाबत बोलतांना साबळे म्हणाले की, गेवराई पायगा गावात विहिरीचे 20 प्रस्ताव दाखल झाले असून या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी 12 टक्के रक्कम मागत आहेत. बुधवारी कनिष्ठ अभियंता गायकवाड, ग्रामरोजगार सेविकासोबत गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी आणलेले 1 लाख रुपये न घेता मला कार्यालयाबाहेर पाठविले. त्यानंतर कनिष्ठ अभियंता आणि रोजगार सेवकाला पाठवून 12 टक्के प्रमाणे रक्कम देण्यास सांगितले. यामुळे आज 2 लाख रुपये घेऊन मी कार्यालयात आलो. पण त्यांनी पैसे घेतले नाहीत, अशी माहिती मंगेश साबळे यांनी दिली.
मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…
नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…
मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…