महाराष्ट्र

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला; आमदार सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र आक्षेप घेत हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी घातक असल्याचे म्हटले आहे.

तांबे यांनी सांगितले की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक आणि अहिल्यानगरसाठीच नव्हे, तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड आणि मार्गावरील ग्रामीण भागासाठीही महत्त्वाचा ठरणार होता. या रेल्वेमुळे पुणे शहरावरील लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत झाली असती. मात्र सरळ आणि सोपा प्रकल्प गुंतागुंतीचा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची टीका त्यांनी केली.

या निर्णयामागे राजकारण किंवा अन्य काही कारणे आहेत का, असा सवाल उपस्थित करत तांबे म्हणाले की, रेल्वे प्रकल्प हे शंभर वर्षांच्या दृष्टीने नियोजन केले जाणारे प्रकल्प असतात. त्यामुळे जनतेच्या दीर्घकालीन हिताचा विचार करूनच निर्णय घेतले पाहिजेत. अन्यथा भविष्यातील पिढ्या हा निर्णय माफ करणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. यापूर्वी मुख्यमंत्री यांनी या प्रश्नावर तज्ज्ञ समिती नेमून मध्यम मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते, अशी आठवणही त्यांनी l दिली.

नाशिकच्या औद्योगिक, आयटी आणि सेवा क्षेत्राच्या विकासासाठी उत्तम रेल्वे कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनीही या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले. तसेच सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर, खेड आणि संपूर्ण प्रस्तावित मार्गावरील नागरिकांनी एकत्र येऊन या निर्णयाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

सत्ताधारी पक्षातील आमदार आणि खासदारांनी पक्षीय दबावापेक्षा जनहिताला प्राधान्य देऊन भूमिका घ्यावी, असेही तांबे म्हणाले. “लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा आवाज उठवणे हेच आपले कर्तव्य आहे. जनहितापेक्षा कोणताही पक्ष किंवा नेतृत्व मोठे नाही,” असे सांगत त्यांनी सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेlध केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago