महाराष्ट्र

राहुल गांधी यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गिग वर्कर्सना मोफत पेट्रोल वाटप

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते राहुल गांधी यांच्या कार्यावर आधारित ‘शिदोरी’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस अभिजित सपकाळ, गुरबिंदरसिंग बच्छेर, प्रदेश सरचिटणीस व ‘शिदोरी’चे प्रबंधक संपादक अनंत मोहोड, कार्यकारी संपादक सुनिल खांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, मुंबई युवक काँग्रेसच्या वतीनेही राहुल गांधी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आणि मुंबई उत्तर मध्य जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखील रुपारेल यांच्या पुढाकाराने ‘गिग वर्कर्स सन्मान’ उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत अॅप-आधारित दुचाकी वितरण सेवा देणाऱ्या गिग वर्कर्सना मोफत पेट्रोलचे वाटप करण्यात आले.

तसेच कुलाबा विधानसभा मतदारसंघातील मुंबई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देणे, युवा पिढीला सक्षम बनवणे आणि समाजसेवेची बांधिलकी जपणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी मुंबई युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस तेजस चंदूरकर तसेच युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत देशातील महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि लोकशाहीवरील आव्हानांबाबत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांचे नेतृत्व देशासाठी महत्त्वाचे असून त्यांना पंतप्रधानपदावर विराजमान करण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

14 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago