महाराष्ट्र

सप्टेंबर महिना उजाडला; ऑगस्टचा हफ्ता मिळणार तरी कधी? मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या थेट बँकेत दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये. त्यामुळे या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत.

ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर उजाडला तरी सुद्धा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे. एकूणच लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे.

ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार यावरुन विविध चर्चा सुरू असतानाच आता मंत्री अदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत भाष्य केलं आहे. महिन्याच्या हप्त्याबाबत भाष्य करताना म्हटलं, एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येईल.

मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरीत होईल. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा महायुती सरकारचा संकल्प आहे. लाडकी बहीण योनजेचा जो काही लाभ आहे तो अशाच प्रकारे सुरू राहणार आहे असंही मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार

मंत्री अदिती तटकरे यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया देताना म्हटलं, जो काही जाहिरनामा असतो तो पाच वर्षांसाठी असतो. आम्ही जाहिरनाम्यात 2100 रुपयांचं आश्वासन महायुतीने दिलं होतं आणि ते नक्कीच आम्ही पूर्ण करू. सध्या प्राधान्य हे योजनेचा लाभ नियमितपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आहे. ज्या वेळी योग्य वेळ असेल त्यावेळी नक्कीच 2100 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यात येईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

15 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

19 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

21 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago