महाराष्ट्र

पुण्यातील आंदेकर टोळीने केलेल्या खळबळजनक हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

पुणे: 5 संप्टेंबर 2025 रोजी पुणे शहरात सर्वत्र गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची तयारी जोरदार सुरु आहे. असे असताना पुण्याच्या नाना पेठेत हत्येचा थरार पहायला मिळाला. पुण्यातल्या नाना पेठेतील आंदेकर टोळीने फिल्मा गँगवार केले.यात एका १९ वर्षीय तरुणाचा 3 गोळ्या घालून ठार केलं आहे. हा तरुण वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी गणेश कोमकरचा आयुष कोमकर हा मुलगा होता. पुण्यातील आंदेकर टोळीने केलेल्या खळबळजनक हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.

नाना पेठेत गँगवॉरमधून 17 वर्षाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. पुण्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्षभरापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा, गोळीबार तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह 16 आरोपींना अटक करण्यात आली होती. आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी त्याच्यावर गोळीबार झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच हा खून घडवून आणल्याचा आरोप होतोय.

पोलिसांचा धक्कादायक खुलासा

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना वनराज आंदेकरचे वडील आणि मृताचे आजोबा बंधू आंदेकर यांच्यासह इतर नातेवाईकांनी आखली होती. पोलिसांना आंदेकर टोळी “बदलाच्या हत्येचा” कट रचत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. “क्राइम ब्रँचने आधीच आठ जणांना अटक केली होती. तथापि, कोणीतरी (बंधू आंदेकर) त्याच्याच नातवाला लक्ष्य करेल अशी कोणतीही ठोस माहिती नव्हती. सध्याच्या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि इतरांचा शोध सुरू आहे.” खुनाचा कट रचण्याचा प्रयत्न केला जात होता. गुन्हा शाखेने हे सगळं उघड केलं होत. पण एक व्यक्ती त्यांचेच नातवाचा खून करतील अशी कोणती माहिती मिळाली नव्हती. पण आता ही घटना घडलेली आहे या घटनेमध्ये जे जे आरोपी आहेत त्यांना परिणाम भोगायला लागणार काही आरोपींना यामध्ये अटक केली आहे राहिल्यांना पुढे अटक केली जाईल असे देखील ते म्हणाले.

काय आहे नेमकं प्रकरण

1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा, गोळीबार तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह 16 आरोपींना अटक करण्यात आली होती. आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी काॅम्प्लेक्स सोसायटीत आला. तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता, त्या वेळी आरोपी अमन खान, यश पाटील हे सोसायटीच्या आवारात दबा धरून बसले होते. आरोपींनी आयुष याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करुन खून केला. आयुषच्या खुनाचा कट बंडुअण्णा आंदेकर, तसेच अन्य आरोपींनी रचला. त्यासाठी गोळीबार करणारे आरोपी खान आणि पाटील यांना मदत केली, असे कल्याणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

14 तास ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

14 तास ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

14 तास ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

14 तास ago

शिरूर पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई; दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…

21 तास ago

बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…

21 तास ago