महाराष्ट्र

लैंगिक अत्याचार सहन केला जाणार नाही; पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे

सांगलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल

सांगली: करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली. अत्याचारानंतर मानसिक व सामाजिक दबावामुळे पीडित मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, आरोपींवर कठोर आणि तातडीची कारवाई होणे अत्यावश्यक आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत की, या प्रकरणातील संपूर्ण साक्षी, फॉरेन्सिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा असे सर्व आवश्यक तपशील गोळा करून दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात यावा. यासोबतच त्यांनी सरकारी वकिलांमार्फत मागणी करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात वर्ग करण्याची शिफारसही करण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणात कोणताही राजकीय, सामाजिक किंवा स्थानिक दबाव येऊ नये म्हणून पीडितेच्या कुटुंबीयांना आणि साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली आहे. तपासात पारदर्शकता राखली जावी आणि पीडित कुटुंबीयांना वेळोवेळी माहिती देऊन त्यांचा विश्वास जिंकण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

पुढे बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “अशा घटना केवळ गुन्हा नसून समाजाच्या मानसिकतेवर ओरखडा आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर लैंगिक शोषणविरोधी कायदे आणि POCSO कायद्याबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी जिल्हा प्रशासनाला सामाजिक जागरूकता उपक्रम तातडीने राबवण्याचे आवाहन केले.

शेवटी, आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता टाळण्यासाठी सरकारी वकिलांनी कोर्टात ठोस भूमिका मांडावी, जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, असेही त्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

5 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

5 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

11 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

11 तास ago