महाराष्ट्र

मराठा-ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

मुंबई: हैद्राबाद गॅझेट’च्या अंमलबजावणीवरून राज्यात वादळ उठले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.नाशिकमधील कार्यकर्ता शिबिरात बोलताना त्यांनी आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पवार म्हणाले, आरक्षणाबाबतची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या प्रश्नाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे; पण राज्य सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट नाही. परवा सरकारने ‘हैद्राबाद गॅझेट’वर आधारित निर्णय घेण्याची घोषणा केली. मी स्वतः ते गॅझेट शब्दशः दोनदा वाचले आहे.

हैद्राबाद गॅझेटमध्ये काय आहे

पवारांनी स्पष्ट केलं, की गॅझेटमध्ये काही सवलती दिल्या असल्या तरी त्या फक्त शेतकऱ्यांपुरत्या मर्यादित नाहीत. व्हीजेएनटी (VJNT) आणि बंजारा समाजाला आदिवासींचा दर्जा देण्याचा उल्लेख त्यात आहे. त्यामुळे या समाजांतून आता नवी मागणी पुढे येत आहे.

त्याचवेळी आदिवासी समाजाचे शिष्टमंडळ पवारांना भेटले असून त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आमच्या कोट्यात हात घालू नका.” या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, “राज्य सरकार जर चुकीचे निर्णय घेत असेल तर समाजात कटुता वाढेल, विभागणी होईल. आज त्याचीच लक्षणे दिसत आहेत. सरकारचा दृष्टिकोन मला योग्य वाटत नाही.”

‘त्या’ दोन समित्यांवर प्रश्नचिन्ह

राज्य सरकारने आरक्षणाबाबत दोन समित्या स्थापन केल्या आहेत. एक बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली (ओबीसींसाठी) आणि दुसरी विखे यांच्या अध्यक्षतेखाली (मराठ्यांसाठी). यावर टीका करताना पवार म्हणाले, “बावनकुळे कमिटीत फक्त ओबीसी आहेत, तर विखेंच्या कमिटीत जवळजवळ सगळेच मराठा आहेत. अशा प्रकारे केवळ एका जातीची समिती कधी करायची नसते. विविध घटकांना सामावून घेऊन संवाद साधण्याची पद्धत असते.”

सामाजिक वीण धोक्यात 

पवारांनी पुढे इशारा दिला की, “दोन वेगळ्या कमिट्यांची खरंच गरज होती का? एका समितीकडून एक मागणी, दुसरीकडून दुसरी मागणी येते आहे. मग सरकारला प्रश्न सोडवायचा आहे की फूट पाडायची आहे? हा प्रश्न योग्य रीतीने हाताळला नाही तर महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवेल आणि हे अतिशय धोकादायक ठरेल.”

‘पंतप्रधान मोदींची कार्यपद्धती चुकीची’

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत पवार म्हणाले, ”गेल्या आठ महिन्यांत महाराष्ट्रात ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत उदासीन असल्यामुळे शेतमालास योग्य भाव मिळत नाही. कांदा निर्यातीबाबत ठोस धोरण या सरकारला ठरविता आलेले नाही. द्राक्ष आणि डाळिंब उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग करतो. तंत्रज्ञानाचा वापर करतो. त्यामुळे कांदा म्हटले की सर्वांचे लक्ष नाशिककडे लागते. नाशिकला प्रयोगशील शेतकरी असून महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्या विचारांवर चालणारा हा जिल्हा आहे. येथील जिल्हा बँक डबघाईला गेली आहे. मात्र, देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती चुकीची असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना बसला आहे.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

8 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago