राजकीय

देवाभाऊ’च्या सरकारने पुढच्या एका महिन्यात कर्जमाफी केली नाही तर

मुंबई: शरद पवार कृषिमंत्री असताना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. शेतकरीआजअडचणीत असतानाअशीकर्जमाफी का होत नाही? इथले शेतकरी आम्हाला भेटले, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँ केचे 65 हजार सभासद आज अडचणीत आहेत. नाशिक जिल्हा बॅंकेची चौकशी लावण्या चे काम आम्ही करू.

शिवाय दिल्लीत आम्ही 8 खासदार या संदर्भात आवाज उठवू. हा मोर्चा म्हणजे एका मोठ्या कामाची छोटी सुरवात आहे. आज विनम्रपणे आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कर्जमाफी संदर्भात सांगा. त्याqनंतर जर एक महिन्याच्या आत आम्हाला कर्जमाफी दिले नाही तर आम्ही सरकारला कुठेही फिरू देणार नाही. 1 महिन्यात देवा भाऊच्या सरकारने कर्जमाफी केली नाही. तर ‘देवाभाऊ’च्या सरकारला राज्यात फिरू देणार नाही, असा गंभीर इशारा देत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्याना नाशिक येथे आयोजित शेतकरी आक्रोश मेळ्याव्यात बोलत होत्या.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार आणि आमचा पक्ष आता स्वस्थ बसणार नाही. आम्ही 8 खासदार, कृषिमंत्री आणि पंतप्रधान यांना भेटून कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा आणि मागणी करू. शिवाय तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची योग्य वेळ, पण….

महाराष्ट्र समोर अनेक आव्हाने आहेत. 15 वर्षांपूर्वी जी स्थिती होती आता तशी परिस्तिथी नाही. सरकारने कितीही सांगितले इन्व्हेस्टमेंट आल्या पण तसे नाही. डेटा तसा सगळं सांगतोय. हिंजवडीत नोकऱ्या गेल्या. टेरिफमुळे आपल्या सॉफ्टवेअरचे काय होईल सांगता येत नाही. अर्थव्यवस्था ज्या वेगाने पुढे जायला पाहिजे होती, तशी गेलेलीनाही. जीएसटीत बदल केले त्याचे स्वागत करते, पणत्यात उशिर केलाय. काळ ठरवेल किती बदल होईल. पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. लाडक्या बहिन योजनेची २५ लाख नावे कमी झाली. सध्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. त्यामुळे योग्य वेळ आली आहे. महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. नाशिकमधील शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांनी शेतात काळे झेंडे लावले आहेत. दर 3 तासाला शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतोय, हे मकरंद आबाचे वाक्य आहे. असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

11 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

11 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

11 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

11 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

11 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

11 तास ago