महाराष्ट्र

पदभार स्वीकारताच शशिकांत शिंदेंचा मोठा धमाका; रोहित पवारांना दिलं महत्वाचं पद

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यपदाचा जयंत पाटील यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच विधान परिषदेचे आमदार शशीकांत शिंदे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. आता पक्षातून आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच आमदार रोहित पवार यांची मोठ्या पदावर नियुक्ती केली आहे.

शशिकांत शिंदे यांनी बुधवारी रोहित पवार यांना नियुक्तीचे पत्र दिले. प्रदेश सरचिटणीस आणि पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेलच्या प्रभारीपदाची मोठी जबाबदारी रोहित पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षामध्ये तरूण नेत्यांना संधी देण्याबाबतच्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेला बळ देणारी ही नियुक्ती असल्याचे मानले जात आहे. या नियुक्तीबाबत रोहित पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज पक्षाने ही महत्त्वाची जबाबदारी देताना माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पक्षाचा मनापासून आभारी आहे.

पक्षाच्या सर्व ज्येष्ठ आणि प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय-धोरणे, कार्यक्रम आणि महाराष्ट्र धर्म व शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे पक्ष वाढीसाठी पूर्ण समर्पणाने काम करण्याचा माझा कायम प्रयत्न राहील. हे काम करताना आजपर्यंत जसं सर्वांचं सहकार्य लाभलं तसंच यापुढंही राहील, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे शरद पवार यांच्या पक्षात यापुढील काळातही मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, रोहित पवार यांच्यावर पहिल्यांदाच पक्षसंघटनेतील मोठ्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या नियुक्तीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहेत. तर आता रोहित पवार प्रदेश सरचिटणीस असतील. त्यामुळे एकप्रकारे महाराष्ट्रातही पक्षातील महत्वाच्या पदाची जबाबदारी पवार कुटुंबातील सदस्याकडे आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पाणीटंचाईचे संकट गडद! महापौर मंजुषा नागपुरेंचे प्रशासनाला कडक आदेश

पाणीगळती, पाणीचोरी आणि टँकरच्या काळाबाजारावर कारवाई होणार; पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांचे नळजोड तोडणार! पुणे :…

5 तास ago

शिरुर; न्हावरे रस्त्यावर दुचाकीवरुन पडुन जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय…

6 तास ago

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या चोरी; घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन…

6 तास ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा…

8 तास ago

शिरूर! कारेगावात तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार करत थेट जीव घेण्याचा प्रयत्न…

कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका…

8 तास ago

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न; ‘बाप्पाचा कट्टा’चा ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रम सुरू!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…

20 तास ago