महाराष्ट्र

शिवाजीराव आढळराव पाटील यांना हात-पाय तोडण्याची धमकी…

खेड (पुणे) : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. लांडेवाडी येथील घरी जाऊन हात-पाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी 17 जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, सचिन पडवळ, निलेश वाघमारे, कुमार ताजणे, गोरक्ष सुखाळे, सुरेश चव्हण शंकर दाते, नवनाथ कोतवाल, काका कुलकर्णी, दत्ता भांबुरे, तुषार सांडभोर, बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर, बाजीराव बुचडे (सर्व रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व जण शिवसेनेचे कार्यकर्ते असून शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाल्याने पुणे-नाशिक महामार्गावर आंदोलन केले होते.

आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभागप्रमुख अंकुश किसन शेवाळे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांचा फोटो गाढवाच्या चेहऱ्यावर लावून त्यावर चप्पलने मारुन चपलांचा हार घातला. त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन करण्यात आले. तसेच लांडेवाडी येथील घरी जाऊ हात पाय तोडण्याची धमकी दिली. याबाबत पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

7 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

7 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

15 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago