मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे .चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट औषध म्हणून करता येतो तसेच चिंचेच्या उपयोगाने मुळापासून बरे होतात रोग तर जाणून घेवूया उपयोग.
१) चिंचेपासून तयार केलेले “चिंचालवण तेल” पोट दुखीवरचे उत्तम औषध आहे. जेवताना भाताच्या पहिल्या घासाबरोबर हे तेल मिसळून घेतले कि पोट दुखीसारखी लवकर बरी होते.
२) पिकलेली चिंच वातपित्त आणि कफ अशा दोषांचे शमन करते. चिंचेचे सरबत उत्तम पित्तशामक आहे. ज्यांना पित्त वाढून शरीरात उष्णता वाढत चालली आहे असे वाटते त्यांनी एक कप चिंचेचे सरबत उष्णता कमी होईपर्यंत घ्यावे. चिंचेच्या फुलांचा गुलाबाचा गुलकंद बनवतो तशाच पद्धतीने गुलकंद तयार करावा. तो उत्तम पित्तशामक आहे.
३) तोंडाला चव नसेल तर चिमुटभर मीठ लावून पिकलेली आणि मऊ झालेली चिंच खावी. हृदयाची ताकद कमी झाली कि पिकून मऊ झालेली काळी चिंच सरबत करुन घ्यावी. हृदयाच्या स्नायूंना ताकद देण्याचे काम चिंच करते.
४) मुका मार लागून सूज आली कि चिंचोके (चिंचेच्या बिया) वाटून त्याचा लेप करावा. चिंचेची पाने आणि चिंचेचा गार यांचाही लेप वेदना आणि सूज कमी करणारा आहे.
५) काविळी मध्ये खाण्यावरची इच्छा मरुन गेली कि रुग्णाला पिकलेली चिंच खायला द्यावी. चिंचेचे सरबत काविळी मध्ये अमृताचे काम करते. चिंचेच्या फुलांचा ताजा रस नियमित घेतला तर रक्ती मुळव्याध कमी होतो. पचन शक्ती वाढवून आरोग्यप्राप्ती करुन देणारी चिंच खरंच एक स्वस्तातले औषध आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…