महाराष्ट्र

शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २३ जून २०२६ रोजी जारी केलेल्या नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या हिरक महोत्सव मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांचा “बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते” असा गौरवपूर्ण उल्लेख करत, त्यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपविण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

या नियुक्तीनंतर संजय राठोड यांच्याकडे दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतील. पश्चिम विदर्भात शिवसेनेच्या संघटन विस्ताराला गती देणे आणि राज्यासह देशभरातील विमुक्त व भटक्या समाजात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे, या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपविण्यात आल्या आहेत.

नियुक्तीपत्रात भटक्या व विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय सशक्तीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संजय राठोड यांच्या सामाजिक कार्यातील योगदान, नेतृत्वगुण आणि संघटनात्मक क्षमता लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य व देशभरात विमुक्त व भटक्या समाजात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, “पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवानेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करेन,” अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

8 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

9 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

9 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

9 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

9 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

9 तास ago