महाराष्ट्र

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी केली आहे.

बिक्कड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या मतलेखात राम मंदिर हे कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे प्रतीक असल्याने मंदिराशी संबंधित प्रत्येक आर्थिक व्यवहार पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मंदिरासाठी मिळालेल्या देणग्या, सोने-चांदी, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या नोंदी व वापराबाबत स्पष्ट माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली.

तसेच मंदिरासाठी झालेल्या जमीन खरेदी व्यवहारांबाबत तसेच निधीच्या वापराबाबत विविध माध्यमांमध्ये आलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, असेही त्यांनी नमूद केले. आरोप निराधार असतील तर वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि गैरव्यवहार झाला असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

राम मंदिर हे कोणत्याही राजकीय पक्षाची मालमत्ता नसून संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचे केंद्र असल्याचे सांगत, मंदिराच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करणे नसल्याचेही बिक्कड यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

8 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

9 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

10 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

10 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

10 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

10 तास ago