महाराष्ट्र

…त्यामुळे पक्षप्रवेश थांबला

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत काल आणि आज दोन भागांमध्ये प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून या मुलाखतीवर सत्ताधारी पक्षांतील अनेकांनी टीकाही केल्याचे पाहायला मिळत आहे. अशात भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनीही उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टिप्पणी करत ‘ठाकरे ब्रँड’ संपला असल्याचे म्हटले आहे.

७ ते ८ खासदार…

याचबरोबर गिरीश महाजन यांनी एक खळबळजनक दावा केला असून त्यांनी म्हटले की, विरोधी पक्षातील, खास करून शिवसेनेतील (उद्धव ठाकरे) ७ ते ८ खासदार मनाने आपल्यासोबत आहेत. कायदेशीर अडचणी असल्यामुळे पक्षप्रवेश होऊ शकत नाही.

यावेळी गिरीश महाजन यांनी सर्वच विरोधी पक्षांतील खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. यामध्ये आणखी वाढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच त्यांच्या संपर्कात सर्वच पक्षांतील खासदार असून, ठाकरे गटातील सर्वाधिक खासदार संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ठाकरे ब्रँड तेव्हाच संपला

संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी ‘ठाकरे ब्रँड’चा उल्लेख केला होता. याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “ठाकरे ब्रँड केव्हाच संपलेला आहे. बाळासाहेब होते तेव्हा विषय वेगळा होता. २०१९ ला तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली तेव्हाच ठाकरे ब्रँड संपला.”

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामार आणि त्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या व्हिडिओबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “पोलिसांवर कोणी अरेरावी करत असेल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

57 मिनिटे ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

1 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

1 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

1 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

1 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

2 तास ago