महाराष्ट्र

ठाणे जिल्ह्यात SIR चे काम 100 टक्के पूर्ण

ठाणे: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत नियोजित कामे 100 टक्के पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या 74 लाख 50 हजार 515 मतदारांचे 100 टक्के EF प्रिंट काढण्यात आले आहे. त्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून EF डिजिटायझेशनचे काम सुरू असून, आतापर्यंत 45 लाख 88 हजार 756 मतदारांचे म्हणजेच 61.59 टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यात एकूण 6 हजार 894 मतदार यादी भाग असून, तेवढ्याच संख्येने BLO कार्यरत आहेत. सर्व BLOना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदार यादीतील सर्व भागांचे EF डाउनलोड करण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.

या मोहिमेत जिल्हा निवडणूक अधिकारी, महापालिका आयुक्त, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, BLO, सहाय्यक, पर्यवेक्षक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांचे सहकार्य लाभले.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संपूर्ण प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी विविध पथकांमध्ये समन्वय साधत क्षेत्रीय स्तरावरील अडचणी दूर करून कामाला गती दिली.

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन तसेच मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, BLO आणि जिल्हा निवडणूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे SIR अंतर्गत निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यात आले. या कामगिरीबद्दल ठाणे जिल्हा प्रशासनाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

5 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

5 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

5 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

5 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

5 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

16 तास ago