मुंबई: राज्यातील एसटी बसस्थानके आणि एसटी प्रवास महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी अधिक सुरक्षित करण्याच्या मागणीची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. बसस्थानकांवरील सुविधा आणि आवश्यक सुधारणांचा आढावा घेऊन सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत.
विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात मंत्री सरनाईक यांना निवेदन दिले. महिला प्रतिनिधींनी राज्यातील २० जिल्ह्यांमधील ८७ बसस्थानकांची पाहणी केली असून, अनेक ठिकाणी महिला प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले.
या पाहणीत स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा रक्षक, पोलीस गस्त, सीसीटीव्ही तसेच महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह या सुविधांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
महिला सुरक्षेसाठी सर्व प्रमुख बसस्थानकांचे सुरक्षा ऑडिट करावे, चालक-वाहक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना लिंगसंवेदनशीलतेचे प्रशिक्षण द्यावे, छळाच्या घटनांवर तातडीने कारवाई करण्यासाठी स्पष्ट एसओपी तयार करावी, हेल्पलाईन व तक्रार यंत्रणेची माहिती ठळकपणे प्रदर्शित करावी आणि विभागीय स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.
दरम्यान, महिला प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष आढावा बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. सार्वजनिक वाहतुकीतील महिला सुरक्षेबाबत अक्षरा सेंटरच्या सह-संचालिका डॉ. नंदिता शहा यांच्या कामाचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला.
“सुरक्षित प्रवास हा महिला प्रवाशांचा अधिकार आहे. सर्व संबंधित विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून कालबद्ध कृती आराखडा राबविल्यास राज्यातील एसटी सेवा अधिक सुरक्षित आणि प्रवासीस्नेही होईल,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…
ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…
जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…