ST
जालना: औरंगाबाद-जालना महामार्गावरील वरुड काजी फाट्याजवळ स्मार्ट बसने पेट घेतल्याची घटना उघडीस आली असून बस मधील लहान मुलासह 7 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, स्मार्ट बसच्या पुढील डाव्या टायरमध्ये आवाज येत असल्यामुळे चालकाने बस डाव्या बाजूला उभी करुन बसमध्ये आवाज कशाचा येतोय हे पाहण्यासाठी खाली उतरले असता त्यांना इंजिनच्या खालून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी गाडीतील पूर्ण प्रवाशांना मागील दरवाजाने खाली उतरवले.
सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली. चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने या घटनेचा तपास सुरु आहे. गाडीमध्ये असलेल्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी, असा चालकाचा प्राथमिक अंदाज आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …