महाराष्ट्र

गणेशोत्सवात महिला सुरक्षेसाठी ‘स्त्री आधार केंद्रा’तर्फे विशेष स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम

पुणे: १९८४ पासून महिलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या स्त्री आधार केंद्रातर्फे यंदाही गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी “महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत एस. एम. जोशी सभागृह, पहिला मजला, पत्रकार भवन मागे, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेच्या उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा ना. डॉ. नीलम गोऱ्हे असतील.

प्रमुख मार्गदर्शक आणि विषय:

पोपट येले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बॉम्ब शोधक व नाशक पथक)

विषय: “स्फोटकांवरील नियंत्रण व सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी: बॉम्बस्फोट विरोधी पथकाचा परिचय”

विवेक नायडू (आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक)

विषय: “शहरी आपत्ती व्यवस्थापन व कायदेसंमत कृती: महापालिकेची जबाबदारी व नागरिकांचे अधिकार”

पंकज देशमुख (अपर पोलीस आयुक्त, पुणे)

विषय: “सण आणि महिला सुरक्षितता: कायदेसंरक्षण यंत्रणा व समाजाची भूमिका”

कार्यक्रमाची पार्श्वभूमी:

गणेशोत्सव काळात पुण्यात आणि महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांतून नागरिक मोठ्या संख्येने येतात. यामुळे चोरी, महिलांची छेडछाड, मुलांचे हरवणे, अपहरण व तस्करी अशा घटनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यावर प्रतिबंध करण्यासाठी, स्त्री आधार केंद्र दरवर्षी महिला स्वयंसेवक घडवून तयार करते. हे प्रशिक्षण त्याच उपक्रमाचा एक भाग आहे.

या कार्यक्रमामध्ये पुणे शहरातील २० पोलीस स्टेशन हद्दीतून ८० महिला स्वयंसेविका निवडल्या जात असून, त्यांना स्त्री आधार केंद्राची ओळखपत्रे दिली जातील. हे स्वयंसेवक पोलीस यंत्रणा आणि गणेश मंडळांसोबत समन्वय साधून गर्दीच्या ठिकाणी महिलांचे संरक्षण, हरवलेली बालके, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अशा बाबतीत सहकार्य करतील.

हा उपक्रम गेल्या २३ वर्षांपासून यशस्वीरित्या राबवला जात आहे. गेल्या वर्षीही या प्रशिक्षणामुळे अनेक हरवलेली मुले पालकांपर्यंत सुरक्षित पोहोचवली गेली होती. रांगा नियोजन, स्त्रियांना स्वतंत्र आणि सुरक्षित मार्गदर्शन देणे, अशा गोष्टींसाठीही स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago