महाराष्ट्र

दहशतवादाला रंग नसतो, दहशतवादी दहशतवादीच, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे

रेल्वे स्फोटाच्या निकालाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, तसे मालेगाव बॉम्बस्फोट निकालावरही सुप्रीम कोर्टात जाणार का

मुंबई: काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिलेला आहे. महात्मा गांधी, इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी यांच्या बलिदाने काँग्रेसने दहशतवादीचा मोठी किंमत मोजलेली आहे. या दहशतवादाला कोणताही रंग नसतो दहशतवादी हा दहशतवादीच असतो, त्याला शिक्षा झाली पाहिजे असे स्पष्ट करत मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे तसेच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावरही सुप्रीम कोर्टात जाणार का, हे स्पष्ट करावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

मालेगावात बॉम्बस्फोटाच्या निकालावर टिळक भवन येथे पत्रकरांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटात ६ लोक ठार तर १०० वर जखमी झाले ही वस्तुस्थिती आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर. आर. पाटील व या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता, त्यांचे आज स्मरण होत आहे तसेच “केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींबद्दल सौम्य भूमिका घ्यावी,असे तपास यंत्रणा एनआयए च्या अधिकाऱ्याने सांगितले होते”, या विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी केलेले वक्तव्यही आजच्या निकालानंतर महत्वपूर्ण ठरत आहे.

सपकाळ पुढे म्हणाले की, न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे पण हा बॉम्बस्फोट कोणी केला हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो. सरकारची भूमिका दहशतवादविरोधी असायला पाहिजे. रेल्वे स्फोटाच्या निकालावर जर सुप्रीम कोर्टात जाण्याची भूमिका आहे तर मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावरही सुप्रीम कोर्टात जावे लागेल, सरकारला दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. आज जसे आरोपी निर्दोष सुटले तसेच स्वातंत्र्यानंतरचा देशातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली. या प्रकरणातील ७ आरोपींपैकी ६ जणांना शिक्षा ठोठावली पण सावकर यांची निर्दोष मुक्तता झाली. या प्रकरणातील कपूर आयोगाच्या अहवालात सावरकरांवर ठपका ठेवलेला आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

3 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

7 तास ago

उबाठा गटाला मोठा धक्का! अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…

13 तास ago

एकनाथ शिंदेंची बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत उद्धव-राज-राहुल गांधींवर टीका

मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना" असल्याची टीका…

13 तास ago

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार…

13 तास ago

ठाणेच्या वाहतुकीला मोठा दिलासा; २०० कोटींच्या तीन हात नाका प्रकल्पाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा…

14 तास ago