महाराष्ट्र

विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विद्यार्थी सुरक्षित वाहतूकीसह बेरोजगारांना रोजगाराची ही संधी

मुंबई: शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनाधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. या बाबतची अधिसूचना जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.परिवहन विभागाने बोलावलेल्या पालक आणि बस संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनधिकृत वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचा मुद्दा गाजला होता. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यँत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. सदर वाहने BS-VI या श्रेणीतील असणारं आहेत. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश केला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

राज्य सरकारकडून परिवहन विभागामार्फत सन २०१८ पर्यँत स्कूल व्हॅनसाठी परवाने देण्यात येत होते. मात्र स्कूल व्हॅन विद्यार्थी वाहतूकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्राच्या मानकानुसार राज्य शासनाने नियमावली तयार करून व्हॅन सुरू करण्याबाबतची सूचनावली प्रसिद्ध केली आहे. त्याआधारे राज्य सरकारने हे धोरणात्मक पाऊल टाकले असुन या संदर्भात अधिसूचना जारी होईल, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात. चार चाके असल्याने वाहन उलटण्याची शक्यता नगण्य असते. व्हॅनमध्ये शाळेची बॅग, पाण्याची बाटली आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीला प्रथम प्राधान्य आहे. सुरक्षित वाहतूकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी स्कूल व्हॅनला मंजुरी देण्यात येत आहे. नव्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूकीचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना राज्य सरकारकडून परवाने देण्यात येतील. राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री 

स्कूल व्हॅनमधील वैशिष्ट्ये

जीपीएस

सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन

अग्निशमन अलार्म प्रणाली

दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा

ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर

पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे

स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी

गाडीच्या छतावर शाळेचे नाव

(अभिजीत भोसले)

जनसंपर्क अधिकारी 

मा. मंत्री परिवहन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

52 मिनिटे ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

12 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

12 तास ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

12 तास ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

12 तास ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

13 तास ago