महाराष्ट्र

पुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज सकाळी कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत १० महिलांचा जागीच मृत्यू झाला असून २९ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

जखमींना खेड तालुक्यातील आणि परिसरातील पाच वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते. या महिला यावेळी अतिशय भक्तीमध्ये दंग होऊन देवाची गाणी म्हणत कुंडेश्वर मंदिर दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला.

विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त करताना म्हटले, “दर्शनाच्या पवित्र हेतूने निघालेल्या भगिनींवर मृत्यूचा आघात होणे अत्यंत वेदनादायी आहे. या क्षणी राजकारण बाजूला ठेवून पीडित कुटुंबांना मदत करणे हेच आपले कर्तव्य आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाला तातडीने मृत व जखमींची संपूर्ण यादी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले, जेणेकरून नातेवाईकांना माहिती मिळेल. दरम्यान, पोलीस, वैद्यकीय पथक आणि स्थानिक मदतगट घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

10 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

14 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

14 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

14 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

14 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

14 तास ago