महाराष्ट्र

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला स्थगिती; उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दिलासा

ठाणे: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआर प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे. दोन्ही पक्षांची बाजू आणि कागदपत्रे तपासून अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

धनकवडी येथील जमिनीच्या वादाबाबत उषा चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला होता. तसेच त्यांचे पती दत्तात्रय कडू देशमुख यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली होती.

गेल्या २६ वर्षांपासून या जमिनीचा वाद न्यायालयात सुरू होता. अखेरीस न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ याचा जमिनीवरील दावा मान्य केला. मात्र, त्यानंतरही पुण्यातील गोयल गंगा या खासगी विकासकाने या जमिनीचा टीडीआर आपल्या नावे करून घेतल्याचा आरोप करत उषा चव्हाण यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.

या मागणीसाठी उषा चव्हाण आज आपल्या मुलासह ठाण्यातील आनंदआश्रम येथे आल्या होत्या. तेथे उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी आपली भूमिका सांगितली. त्यानंतर अभिनेते-निर्माते मंगेश देसाई यांनी त्यांचे म्हणणे समजून घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला.

यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून पुणे महानगरपालिकेने केलेल्या टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित दोन्ही पक्ष, विकासक आणि पुणे महापालिकेची स्वतंत्र सुनावणी घेण्यात यावी आणि सर्वांनी आपली कागदपत्रे सादर करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश देसाई यांच्या फोनवरून उषा चव्हाण यांच्याशी संवाद साधत, “कुणावरही अन्याय होऊ देणार नाही,” असे आश्वासन दिले. पुढील सुनावणीवेळी सर्व कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी उषा चव्हाण यांनी आपल्या प्रश्नाची तत्काळ दखल घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंगेश देसाई यांचे आभार मानले. तसेच स्वर्गीय आनंद दिघे यांच्या कार्याचा वारसा शिंदे पुढे नेत असल्याचे सांगत, आता या प्रकरणात न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

4 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

4 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

7 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

8 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

8 तास ago