ST
सवलत धारकांना ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करता येणार नोंदणी
मुंबई: STच्या प्रवासात विविध घटकांतील सवलत धारकांना “स्मार्टकार्ड” बंधनकारक केले आहे. मात्र, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची तसेच इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांच्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने “स्मार्ट कार्ड” योजनेला नोंदणीकरण व वितरणासाठी ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन STमहामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना २५ टक्क्यांपासून १०० टक्केपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत दिली जात आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेली “स्मार्ट कार्ड” काढण्याची योजना ST ने सुरु केली आहे. त्यानुसार ST च्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग तसेच ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्डासाठी नोंदणी करणे किंवा “स्मार्टकार्ड” घेणे शक्य झाले नाही. जुलैमध्ये आषाढी एकादशी निमित्त ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या मागणीनुसार या योजनेला ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
तथापि, पुढील आठवड्यात (दि. ३१ ऑगस्ट ते दि. ९ सप्टेंबर) २०२२ दरम्यान असलेला गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीतही ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण करणेसाठी (दि. ३१.१०.२०२२) पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…