महाराष्ट्र

INDIA कडून उपराष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर होताच सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर येत्या ९ सप्टेंबर रोजी या पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपाप्रणित एनडीएकडून (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपदीपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर सुदर्शन रेड्डी यांनी सर्व पक्षांकडे पाठिंबा मागितला आहे. रेड्डी यांनी तटस्थ असलेल्या व एनडीएतील पक्षांना आणि नेत्यांना त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

बी. सुदर्शन रेड्डी म्हणाले, “मी सर्व पक्षांना मला पाठिंबा देण्याचं आवाहन करतो. मी एनडीएतील घटक पक्षांना देखील पाठिंबा देण्याचं आवाहन करतो.” काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ एम. अन्नादुराई आणि बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर चर्चा झाली होती. या बैठकीत इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांची रेड्डी यांच्या नावावर सहमती झाली. त्यानंतर खरगे यांनी रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली.

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले

बी. सुदर्शन रेड्डी यांच्या निवडीबाबत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “रेड्डी हे देशातील सर्वात प्रतिष्ठित व प्रगतीशील कायदेतज्ज्ञांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे प्रदीर्घ कायदेशीर कारकिर्दीचा अनुभव आहे, ज्यामध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं आहे.

कोण आहेत बी. सुदर्शन रेड्डी

७८ वर्षीय सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. सुदर्शन रेड्डी यांनी हैदराबाद येथे वकील म्हणून त्यांच्या कायदेशीर कारकिर्दीला सुरुवात केली होती. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. रेड्डी यांनी डिसेंबर १९७१ मध्ये आंध्र प्रदेशमध्ये वकिली केली. तसेच आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सिव्हिल प्रकरणांमध्ये वकिली केलेली आहे. त्याचबरोबर १९८८ ते १९९० या दरम्यान आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून सुदर्शन रेड्डी यांनी काम पाहिलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago