महाराष्ट्र

शाळांची उन्हाळी सुट्टी आणि शाळा १६ जुनला शाळा सुरु करण्याचे परीपत्रक अर्धेकच्चे

राज्यातील ICSE आणिCBSE च्या शाळा सरकारच्या लाडक्या 

मुंबई: दि.२९एप्रिल२०२५ ला डॉ. श्रीराम पानझाडे,शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)शिक्षण संचालनालय म.रा., पुणे आणिशरद गोसावी ,शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण संचालनालय) म.रा. यांच्या सहीने उन्हाळी सुट्टी बाबतचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले गेले. त्याच्या अंमलबजावणी साठी ते सर्व संबंधित विभागीय संचालक,शिक्षणाधिकारी,शिक्षण निरिक्षक यांना पाठवण्यात आले. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२५ ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरु करणेबाबतचे हे शासन परिपत्रक मागील शासन परिपत्रक संदर्भासह देण्यात आले आहे. शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२५ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2०२५-२६ सुरु करण्यासाठी पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्यात

१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि. ०२ मे २०२५ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

२) राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.

३) पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १६जून,२०२५ रोजी सुरु करण्यात याव्यात.

४) जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सूट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, दि. २३ जून, २०२५ ते २८जुन २०२५ पर्यंत सकाळ सत्रात ७.०० ते ११.४५यावेळेत सुरु करण्यात याव्यात. सोमवार दि.३०.०६.२०२५ पासून नियमित वेळेत सुरु करण्यात याव्यात. वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. हे परीपत्रक आपल्या अधिनस्त फक्त राज्य मंडळाच्या शाळांना हा नियम लागू होते.तर मग राज्यातील ICSE आणिCBSE बोर्डांच्या शाळांना लागू होतात की नाही. याच शाळा आपली मराठी भाषा द्वितीय भाषा म्हणून शिकवत नाहीत.तिला ग्रेडडे म्हणून राबवतात. अशा शाळांना रेड कार्पेट कशासाठी

राज्यातील इतर शाळा राज्यसरकारच्या आदेशानुसार मे महिन्यात सुट्टी आणि जुनला शाळा उघडण्याचे काम करणार,मग ICSE आणि CBSE ही विशेष अशा कोणत्या दर्जाने काम करतात. ICSE आणि CBSE बोर्डाच्या शाळांना त्या- त्या राज्याच्या सर्व नियम लागू असताना; या शाळा महाराष्ट्र राज्यात सर्व सवलती मदत घेऊन महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाचे GR, परिपत्रकाचे पालन का करीत नाहीत. यामागे काय गौडबंगाल काय आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांच्या सुट्ट्यामध्ये सुसूत्रता का नाही. १६जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या सुरू असताना या शाळा २ जूनला सुरू करून परीक्षा कशा घेत आहेत. मुंबईचे या शाळांतील विद्यार्थी महाराष्ट्रातच आहेत ना. एकाला एक नि दुसऱ्याला एक न्याय ,हे धोरण म्हणजे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांवरही अन्याय आहे की नाही. शिक्षण विभाग झोपेचे सोंग घेत आहे.असे असे का घडते आहे यावर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

सर्व शाळा विदर्भ वगळता एकाच वेळी सुरू का होत नाहीत. ICSE आणि CBSE बोर्डाच्या शाळा या केंद्राच्या देशाच्या लाडक्या आणि या इतर बोर्डाच्या शाळा मंगळ ग्रहावरच्या आहेत का. या शाळांत सुट्ट्यांमध्ये कोणते शैक्षणिक काम सुरू आहे. इथे महत्त्वाचे शैक्षणिक काम दाखवलं जात़ ते नक्की कोणते. या शैक्षणिक कामाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची हक्काची सुट्टी का कमी करीत आहेत. आणि महत्वाचे म्हणजे या शाळा सुरू झाल्याबरोबर परीक्षा कसल्या घेत आहेत. यांच्यावर कुणाचा काही वचक आहे की नाही.या शाळांचे सुट्ट्यांमध्ये परीक्षा घेण्याचे उद्योग तात्काळ बंद करायला हवेत आणि सर्व शाळा १६ जूनलाच उघडल्या पाहिजेत असे पालक आणि शिक्षकही म्हणत आहेत,पण आपल्या मुलांचे भविष्य आणि नोकरीची चिंता म्हणून उघडपणे कुणी बोलत नाहीत. सरकार महत्त्वाचा प्रश्न असा की, या सुट्ट्यांमध्ये सुसूत्रता का नाही. हे परिपत्रक असे तयार का केले गेले ज्यात या शाळांना अलगद बाजूला ठेवले आहे. या शाळा महाराष्ट्रात, मुंबईत आहेत तर मग त्यांना एक न्याय आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना एक असे का होत आहे याची जोरदार चर्चा सुरु आहे. या शाळांना ही अशी मुभा का देत आहेत. या बोर्डाच्या शाळांनी त्या त्या राज्याचे नियम पाळणे बंधनकारक आहे. असे असताना त्यांच्या वर अशी मेहेरबानी का? कोण कोणाची मर्जी राखत तर नाही ना असे अनेक प्रश्न उभे आहेत. महाराष्ट्रात या शाळांनी महाराष्ट्राचे नियम पाळायला हवेतच आणि सर्वसमावेशक सुट्टि व शाळा उघडण्याचे परिपत्रक काढायला हवे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

1 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

1 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

1 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

1 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

1 दिवस ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

1 दिवस ago