आरोग्य

लिव्हर निरोगी ठेवण्याचे उपाय

लिव्हर शरीरातील सगळ्यात महत्वाचं अवयव आहे. ते शरीरातील अनेक कामात महत्वाची भूमिका बजावतं. पण आपल्याच काही चुकांमुळे ते खराब होतं. या चुकांबाबत आपल्याला माहीत नसतं. वेळ निघून गेली की नंतर लिव्हर ट्रांसप्लांटची वेळ येते. अशात लिव्हर चांगलं ठेवणं ही आपली जबाबदारी असते. त्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजे.

दारूचं जास्त सेवन केल्याने लिव्हर जास्त खराब होतं. हे एक कारण आहेच. पण असं अजिबात नाही की, फक्त दारू पिऊन लिव्हर खराब होतं. दारू न पिताही लिव्हर खराब होऊ शकतं. मात्र, आपल्या किचन मध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही लिव्हर चांगलं ठेवू शकता.

साखर घातक: पांढरी साखर म्हणजे रिफाइंड शुगर दारू पेक्षाही घातक आहे. साखरेचा वापर आपण विचार न करता वेगवेगळ्या गोष्टी मध्ये करतो. यामुळे लिव्हर मध्ये फॅट वेगाने जमा होण्यास मदत मिळते. ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या होते. लिव्हरवर फॅट जमा होण्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज म्हटलं जातं. ही समस्या झाली तर लिव्हरचं काम कमजोर होतं. इतकंच नाही तर गूळही साखरे इतकाच लिव्हरसाठी घातक आहे. अशात काही गोष्टींचं सेवन करून लिव्हर निरोगी ठेवू शकता.

हळद-दूध: शरीराची वेदना दूर करण्यासाठी बरेच लोक दुधामध्ये हळद टाकून सेवन करतात. झोपण्याआधी एक ग्लास गरम दुधात चिमुटभर हळद टाकून सेवन करावं. याने शरीर आतून साफ होतं. कारण हळदी मध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात.

आवळा आणि लिंबू पाणी: लिव्हरवरून दारू आणि साखर दूर करण्यासाठी आवळ्याचं सेवन करू शकता. यातील व्हिटॅमिन-सी मुळे लिव्हर साफ होतं. तसेच सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणीही पिऊ शकता. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून सेवन केल्याने डायजेशन चांगलं होतं आणि लिव्हरही साफ होतं.

ग्रीन टी आणि ताजी फळ: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे लिव्हर मधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी ग्रीन-टी चं सेवन करू शकता. यातील अँटी-ऑक्सिडेंटमुळे लिव्हर साफ होतं. त्याशिवाय रोजच्या आहारात ताज्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करावा. यात फायबर आणि इतरही पोषक तत्व असतात.

नारळ पाणी: नारळ पाण्यात भरपूर इलेक्ट्रोलाइट असतात. नारळ पाणी हे एक नॅचरल डिटॉक्स ड्रिंक मानलं जातं जे लिव्हरला हायड्रेट ठेवतं. सोबतच याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यासही मदत मिळते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

16 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

16 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

1 दिवस ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

2 दिवस ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

2 दिवस ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

2 दिवस ago