महाराष्ट्र

अखेरच्या क्षणापर्यंत सुटली नाही साथ; पतीच्या निधनानंतर अवघ्या 20 मिनिटात पत्नीनेही सोडले प्राण

वहागाव: पती- पत्नीचे नाते हे अतूट आणि एकमेकांचे आयुष्य व्यापून टाकणारे असते. चुकूनही मी तुझा हात सोडणार नाही, असे वचन एकमेकांना देत ते निभवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात; पण मृत्यूनंतरही एकमेकांची साथ सोडत नाहीत, अशा काही अपवादात्मक घटना कुठेतरी घडल्याचे कानावर पडते. तळबीडलाही (गुरुवार) अशीच घटना घडली. आयुष्यभर साथ देणाऱ्या पतीच्या निधनानंतर अवघ्या २० मिनिटांतच पत्नीनेही श्वास सोडल्याने हळहळ व्यक्त झाली.

कऱ्हाड तालुक्यातील तळबीड गावात गुरुवारी (दि. २१) घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांनाही अचंबित केले. दिनकर मारुती खोत (वय ९७) व अनुसया दिनकर खोत (वय ९०) असे निधन झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास दिनकर खोत यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांच्या फरकात त्यांच्या पत्नी अनुसया यांनीही अखेरचा श्वास घेतला.

हाडाचा शेतकरी अशी दिनकर खोत यांची गावात ओळख आहे. शेतीत काबाडकष्ट करून त्यांनी संसार फुलवला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पत्नी अनुसया यांची शेवटपर्यंत त्यांना साथ मिळाली. तीन वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्यानंतर सून आणि दोन नातवंडांना त्यांचा आधार होता. वयाच्या नव्वदीनंतरही त्यांनी एकमेकांना साथ दिली.

आजच्या समाजात पतीचे निधन झाले, तर पत्नीचे अन् पत्नीचे निधन झाले, तर पतीचे हाल होतात, हे विदारक चित्र आहे. मी आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही, असे अनेकजण म्हणतात; परंतु हे नाते किती टिकणार? हे वेळेच्या हातात असते; परंतु तळबीड येथील घटनेने एकमेकांवर असलेल्या अपार प्रेमाची प्रचिती दिली.

नातवांकडून मुखाग्नी

घटना कळताच तळबीड ग्रामस्थांनी खोत दांपत्याच्या घरी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. एकाच वेळी दोघांनी प्राण सोडल्याने नातेवाईक, पै- पाहुणे व गावकऱ्यांना गहिवरून आले. एकत्रित काढलेल्या अंत्ययात्रेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शेजारी- शेजारी दोघांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या आजी- आजोबांना नातवांनी मुखाग्नी दिला. काल (शुक्रवार) त्यांचा रक्षाविसर्जन विधी झाला. मात्र, या आकस्मित घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अहिल्यानगरमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी पुणे LCB जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील…

3 तास ago

पुणे; दूध भेसळ प्रकरणात कारवाईचा फास आवळला; ११ आरोपींना न्यायालयीन कोठडी तर १४ आरोपी यापुर्वीच येरवडा कारागृहात

मंचर (प्रतिनिधी): दूधात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या टोळीविरुद्ध मंचर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईला…

5 तास ago

शिरुर बायपासवर बेकायदेशीर रस्ता दुभाजक तोडल्याने चार वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा बळी

शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील शिरुर बायपास येथे संग्राम हॉटेलसमोर मंगळवार (दि ११) झालेल्या चार…

5 तास ago

आयुर्वेदिक औषध कंपन्यांवर FDAचा हातोडा; 10 संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

मुंबई : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी…

6 तास ago

स्वाभिमानीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १२ ठराव; कर्जमाफीसह शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत शेतकरी, शेतमजूर…

6 तास ago

भीमा नदीत वाहून गेलेल्या साहेबराव मुळीक यांचा तीन दिवसांनी मृतदेह सापडला

शिरूर : भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेलेल्या दहिवडी (ता. शिरूर) येथील साहेबराव बबन मुळीक…

6 तास ago