महाराष्ट्र

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा…

पुणे: स्वारगेट बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे एका महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख ( सहाय्यक वाहतूक अधिक्षक) व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे. असे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी ) श्री. विवेक भीमनराव यांना दिले आहेत. तसेच एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षे संदर्भात आढावा घेण्यासाठी उद्या एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलाविण्याचे निर्देश देखील मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

मंगळवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बस मध्ये एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सदर घटनेची परिवहन मंत्री श्री . प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित बसस्थानकावरील त्या वेळी कर्तव्य असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची या प्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षा संदर्भात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी, त्या चौकशीमध्ये ते दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे असे निर्देश दिले आहेत. तसेच या बसस्थांनकावर कार्यरत असलेले सर्व सुरक्षा रक्षक यांना तात्काळ बदलण्यात यावे, तसेच त्यांच्या ऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी. असे निर्देश दिले आहेत. याबरोबरच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील ७ दिवसात आपणास सादर करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी ) श्री. विवेक भिमानवार यांना दिल्या आहेत.

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

सध्या ” महिला सन्मान योजने ” अंतर्गत महिलांना त्यांच्या प्रवास तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे महिलांची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबरोबरच त्यांची सुरक्षितता हा देखील मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. स्वारगेट बसस्थानक वरील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी उद्या महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली आहे. यामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

14 तास ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

14 तास ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

14 तास ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

14 तास ago

शिरूर पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई; दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…

21 तास ago

बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…

21 तास ago