मुख्य बातम्या

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. आरोपी दत्तात्रय गाडेबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. दत्ता गाडे हा राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीतही तो प्रचारात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, आरोपी हा राजकीय व्यक्ती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याअनुषंगानेही चौकशी सुरू केली आहे. आरोपी दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअप डीपीवर आमदाराचा फोटो आहे. शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. आरोपी दत्ता गाडे हा गावातील लोकांना उज्जैन येथे महाकाल येथे दर्शनाला घेऊन जायचा. आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती समोर आली आहे.

स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे विरोधा या अगोदरच जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये असल्याने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. दत्ता गाडे नावाच्या फरार आरोपीचा शोध शिरूर आणि पुणे पोलिस करीत आहेत. दत्ता गाडे याचा नेहमी बसस्थानकावर वावर असायचा अशी माहिती समोर आली आहे. सावज हेरून त्यांना लुबाडण्यासाठी आपण पोलिस असल्याचे सांगायचा. तसे राहणीमानही ठेवायचा. सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील ती फॉर्मल शर्ट, पँट आणि शूज याच वेशात होता. त्याने पीडितेशी संवाद साधताना पोलिस असल्याचे सांगितले होते, अशीही माहिती समोर आली आहे.

पीडित युवती (वय २६) पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस डेपोत आली होती. या पीडित युवतीने आरोपीला फलटणला जाणाऱ्या बसबाबत विचारणा केली. याच प्रश्नाने तिचा घात झाला. आरोपी दत्तात्रय गाडे याने तिचा गैरफायदा घेतला. आरोपीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि लगेचच तिथून फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

युवतीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांकडून सध्या कसून शोध घेतला जात आहे. पुणे पोलिसांच्या तपास पथकांची संख्या 13 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावले आणि धक्कादायक माहिती पुढे आली. दत्तात्रय गाडे याच्या मित्र-मैत्रिणींची गुन्हे शाखेने बुधवारी चौकशी केली. गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरुन चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा. या दोघांची आणखी एक मैत्रीण होती. तिच्याशी पॅचअप करुन दे किंवा तिची भेट घालून दे, असे तगादा दत्तात्रय गाडे माझ्याकडे लावत होता. तो यासाठी मला सतत फोन करुन त्रास द्यायचा, असे या गाडेच्या मैत्रिणीने सांगितले. त्यामुळे दत्तात्रय गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल खडानखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली आहे. दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरुर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी गुणाटमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे. याशिवाय, दत्तात्रय गाडे याच्या आई-वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतले आहे.

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा…

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

12 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

12 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

12 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

16 तास ago