महाराष्ट्र

त्या ‘एसीपी’ला निलंबित करा, अन्यथा…

औरंगाबाद: पोलीस दलातील ‘एसीपी’ अधिकाऱ्यानेच नशेत महिलेचा विनयभंग केल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. अनेक संघटनांनी ढुमे याच्या निलंबनाची मागणी केली आहे. दरम्यान खासदार जलील यांनी मंगळवारी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच घडलेल्या घटनेची माहिती जाणून, ढुमे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.

औरंगाबाद बंदची हाक…

खासदार जलील यांनी डीजीपी रजनीश सेठ यांच्याशी संपर्क करुन घडलेल्या घटनेबाबत चर्चा केली आहे. सोबतच ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ढुमे यांना बुधवारपर्यंत (18 जानेवारी) निलंबित न केल्यास शुक्रवारी (20 जानेवारी) औरंगाबाद शहरात बंद पाळला जाणार असल्याचा इशारा जलील यांच्याकडून देण्यात आला आहे. सोबतच सर्व राजकीय, सामाजिक संघटना आणि नागरिक एकत्र येऊन हा बंद पाळतील. तसेच शहरातील क्रांतीचौक ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येईल असाही इशारा जलील यांनी दिला आहे.

शहरातील नागरिकांत संतापाचे वातावरण!

औरंगाबाद शहरात ज्यांच्यावर सुरक्षेतेची जबाबदारी आहेत तेच पोलीस महिलेचा विनयभंग करत असतील तर नागरिकांनी कोणाकडे मदत मागावी असा प्रश्न औरंगाबादकरांना पडला आहे. त्यामुळे या घटनेने सध्या शहरात मोठ्या संतापाचे वातावरण आहे. तर ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस दलाकडून याबाबत काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

5 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

5 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

5 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

6 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

6 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

19 तास ago