महाराष्ट्र

रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; माहेरच्यांकडून सासरच्या छळाचा गंभीर आरोप

पुणे : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पुण्यातील वाकड परिसरात ३२ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शिल्पा सचिन गवारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप माहेरच्यांनी केला आहे.

शिल्पा यांचा विवाह वाकड परिसरातील गवारे कुटुंबात झाला होता. लग्नानंतर काही काळातच सासरच्या मंडळींकडून त्यांचा छळ सुरू झाल्याचे माहेरच्यांचे म्हणणे आहे. माहेरच्या मालमत्तेतील हिस्सा घेऊन येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. याच कारणावरून त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

‘माझी बहीण असं टोकाचं पाऊल उचलणार नाही’; भावाचा आक्रोश

शिल्पा यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या भावाने तीव्र दुःख व्यक्त करत सासरच्या छळाबाबत गंभीर आरोप केले. शिल्पा अत्यंत संयमी होती. ती स्वतःहून असं टोकाचं पाऊल उचलणार नाही, त्यामुळे नेमकं काय घडलं याचा तपास झाला पाहिजे, अशी भूमिका भावाने मांडली.

भावाच्या आरोपानुसार, शिल्पा यांचे पती सचिन गवारे दारूच्या नशेत त्यांना मारहाण करत होते. मृत्यूच्या काही दिवस आधीही शिल्पा यांच्या डोक्यात इस्त्री मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांना इस्त्रीचे चटके दिल्याचा दावा माहेरच्यांनी केला आहे.

‘मला शेवटपर्यंत भाऊ-बहिणीचं नातं जपायचंय…’

मालमत्तेच्या वादाबाबत बोलताना शिल्पा यांनी आपल्याशी केलेल्या संवादाचा उल्लेख त्यांच्या भावाने केला. ‘भाऊ, तू जिथे सांगशील तिथे मी सही देते. मला सासरच्यांचं ऐकायचं नाही. मला शेवटपर्यंत आपलं भाऊ-बहिणीचं नातं जपायचंय,’ असे शिल्पा म्हणाल्या होत्या, असा दावा भावाने केला.रक्षाबंधनाच्या काही तास आधीच बहिणीचा मृत्यू झाल्याने भावाने व्यक्त केलेला हा आक्रोश मन हेलावून टाकणारा ठरला आहे.

सासरच्या तिघांवर कारवाईची मागणी

या घटनेनंतर शिल्पा यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी पती सचिन गवारे, सासरे उत्तम गवारे आणि सासू संजीवनी गवारे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, शिल्पा यांच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि माहेरच्यांनी केलेल्या आरोपांची सत्यता तपासल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

52 मिनिटे ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

24 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

24 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

24 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

1 दिवस ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

1 दिवस ago