महाराष्ट्र

शिंदेंना सांभाळून घ्या! थेट दिल्लीहून मेसेज, भाजपला नक्की कोणती भीती

नवी दिल्ली: एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटी वाढत असताना दुसरीकडे शिंदेसेनेत अस्वस्थता पसरली आहे. शिंदेसेनेचे अने मंत्री, आमदार वादात अडकत चालले आहेत. त्यामुळे सत्तेत असलेल्या सेनेची गोची झाली आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांची चौकशी सुरु झालेली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाएकी दिल्लीला निघून गेले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर राज्य भाजपला मेसेज गेल्याची सुत्रांची माहिती आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वबळ आजमावून २०२९ साठीची तयारी सुरु करेल, अशी चर्चा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत सोबत लढू. बाकीच्या ठिकाणी युती करायची ते नंतर बघू, अशी भूमिका मुख्यमंत्र्‍यांनी घेतली आहे. शिंदेसेनेला सांभाळून घेण्याच्या सूचना दिल्लीहून करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेची निवडणूक शिंदेसेना आणि भाजप युतीत लढण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मराठी मतदार शिवसेना उबाठा आणि मनसेच्या पाठीशी उभे राहतील, याची भीती भाजपला वाटते. ठाकरे बंधूंच्या विरोधातील मतांची फाटाफूट भाजपला नको आहे. महायुती सोबत लढल्यास उद्धवसेना मुंबईत ४० ते ४५ जागा मिळू शकतात. पण भाजप, शिंदेसेना स्वतंत्र लढल्यास मतविभाजनामुळे उद्धवसेना ६० ते ६५ पर्यंत पोहोचू शकते. उद्धवसेनेनं उभारी घेतल्यास भाजपला फटका बसेल. ते भाजपला नको आहे.

लोकसभा, विधानसभेची निवडणूक भाजपनं शिंदेसेनेसोबत युती करुन लढवली. विधानसभेला चांगलं यश मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य सरकारचं नेतृत्व आलं. त्यामुळे शिंदे यांचं डिमोशन झाल्याचा मेसेज गेला. त्यातच आता शिवसेनेची स्थापना झालेल्या मुंबईत त्यांची साथ सोडल्यास भाजप मित्रपक्षांना वापरतो आणि गरज सरल्यावर दूर सारतो, असा संदेश जनतेत याचीही भीती भाजपला वाटते.

मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती केल्यास भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वाढेल, असंही दिल्लीतील धुरिणांना वाटतं. मुंबईत भाजप मजबूत आहे. त्या तुलनेत शिंदेसेना कमजोर आहे. त्यामुळे भाजप अधिकाधिक जागा लढवू शकतो. शिंदेसेनेपेक्षा दुप्पट जागा लढण्याचा भाजपचा मानस आहे. १२० ते १४० लढवून सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. एकनाथ शिंदेंनी गेल्या काही महिन्यांत उद्धवसेनेचे निम्म्याहून अधिक नगरसेवक गळाला लावले आहेत. त्यामुळे शिंदे अधिकाधिक जागांसाठी आग्रही आहेत.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांची मतपेढी वाढवण्यासाठी नवा प्लान ऍक्टिव्ह केला आहे. दलित मतदारांना जोडून घेण्यासाठी शिंदेसेनेनं गेल्याच आठवड्यात आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेशी युती केली. मुंबईत दलित मतदारांचं प्रमाण मोठं आहे. या मतदारांवर लक्ष केंद्रित करुन रिपब्लिकन सेनेसोबत युती करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे रामदास आठवलेंची रिपाईं महायुतीचा भाग असताना शिंदे यांनी रिपब्लिकन सेनेसोबत युती केलेली आहे. शिंदे यांनी बांधलेलं वेगळं संधान पाहता त्यांनी पुढे दगाफटका झाल्यास स्वबळाची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

13 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago