महाराष्ट्र

काँग्रेसमुक्त भारतची वल्गणा करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला

भाजपा उपऱ्यांचा पक्ष; आता रेशिमबाग नाहीतर अदानी अंबानी चालवणार भाजपानी

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून दुसऱ्या पक्षातील आयत्यावेळी आलेल्यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. भाजपामध्ये ही नाराजी राज्यभर सर्वदूर दिसत असून ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्तामुक्त भाजपा’ झाला आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

बुलढाण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नगरसेवकपदासाठी भाजपामध्ये प्रचंड गोंधळ माजल्याचे चित्र दिसत आहे आणि हेच चित्र आगामी विधानसभा निवडणुकतही दिसेल. मुळ भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून उपऱ्यांच्या हाती भारतीय जनता पक्ष गेल्याने लवकरच या पक्षाचे नियंत्रण हे नागपूरच्या रेशिमबागेतून नाही तर अदानी अंबानी यांच्याकडून होईल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गुंडांचाच पक्ष आहे तो, याआधी त्यांनी माफियांना प्रवेश देण्यात आला, मराठवाड्यात एका वरळी किंगला पक्षात प्रवेश दिला. कोयता गँगशी संबंधित लोक त्यांच्या पक्षात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील भावाच्या शेतातील ड्रग्ज कंपनीचा वितरक हा अजित पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे दिसून आले असे सपकाळ म्हणाले.

नवीन वर्षाचा संकल्प…

२०२६ हे वर्ष काँग्रेससाठी संघटनात्मक वर्ष आहे आणि त्याची तयारी डिसेंबर महिन्यापासूनच झाली आहे. काँग्रेसचे हौसले बुलंद आहेत, पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहेत. वैचारिक कटीबद्धता आहे आणि वैचारिक मेळ व मूठ बांधण्याचे काम नवीन वर्षात करणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

22 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

22 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

22 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago