धनंजय मुंडेंच्या विधानसभा निवडणुकीतील शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली
परळी: माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढ्यात विजय झाला आहे. विधानसभा निवडणूक २०२४ मधील त्यांच्या उमेदवारी अर्ज सोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेत लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा यांनी फौजदारी कारवाई करण्याबाबत फिर्याद प्रकरण दाखल केले होते. याबाबत आज परळी न्यायालयाने निकाल दिला असून सदर प्रकरणातील सर्व आरोप तथ्यहीन असल्याने ते फेटाळून लावले आहेत.
धनंजय मुंडे यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये नमूद माहितीवरून करुणा शर्मा यांनी वेगवेगळे आरोप करत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली, करुणा शर्मा यांनी नोंदवलेला जबाब, वकिलांचा युक्तिवाद यांसह वस्तुस्थिती लक्षात घेत न्यायालयाने करुणा शर्मा यांनी दाखल केलेली फिर्याद फेटाळून लावली आहे. धनंजय मुंडे यांच्यावतीने ॲड. अशोक कवडे यांच्यासह ॲड. हरिभाऊ गुट्टे यांनी काम पाहिले.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाजूने न्यायालयाने आणखी एक निकाल दिला आहे. याआधी देखील कृषी विभागाच्या खरेदी वरून निरनिराळे आरोप करत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये देखील कोणतेही तथ्य आढळले नाही आणि ते प्रकरण देखील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत तक्रारदाराला उलट दंड लावला होता.
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी परळीत एकहाती सत्ता कायम राखली, तेव्हा देखील न्यायालयाच्या निकालात आणि जनतेच्या निकालात आपला विजय झाल्याची भावनिक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली होती. एका पाठोपाठ धनंजय मुंडे यांच्या विरोधातील प्रकरणांचे निकाल पाहता, या याचिका, खटले किंवा ट्रायल या निव्वळ धनंजय मुंडेंच्या बदनामीसाठी रचण्यात आल्याचे दिसून येत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…