नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षातील सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेसचे गटनेते म्हणून राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली असून उपमहापौरपदासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार गटाचे वसंत देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. आज सायंकाळी पाच वाजता काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस नेतृत्वाबाबत संभ्रमाचे वातावरण होते. दिल्ली येथे काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी झालेल्या चर्चेनंतर अखेर या वादावर तोडगा निघाला. वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे नियुक्तीपत्र अधिकृतपणे विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडूनही महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. उपमहापौरपदासाठी खासदार धानोरकर समर्थकांनी अर्ज दाखल केला असला तरी चर्चेनंतर हे अर्ज मागे घेतले जातील, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
महाराष्ट्र काँग्रेसचे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी यांनी चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसला स्पष्ट कौल दिल्याचा दावा करत चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. सध्या काँग्रेसकडे २७ नगरसेवक असून जनविकास सेना (पप्पू देशमुख) यांचे तीन नगरसेवक काँग्रेससोबत आहेत. MIM च्या पाठिंब्यामुळे एक नगरसेवक जनविकास सेनेसोबत असून बसपानेही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या एकूण संख्याबळ ३२ असून बहुमतासाठी आणखी दोन नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्व स्तरावर चर्चा सुरू असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
चंद्रपूर महापालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला स्थायी समिती देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली असून याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर टँकर पलटी झाल्याने तब्बल ३२ तास वाहतूक कोंडी झाल्याच्या घटनेवरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “चंद्रावर-मंगळावर जाण्याच्या गोष्टी केल्या जातात, पण द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रणा अपयशी ठरते. यातून सरकारची कार्यक्षमता जनतेसमोर आली आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…