महाराष्ट्र

ड्रग्ज माफियांचा काळा धंदा उघडकीस! कोंबड्यांच्या शेडमध्ये सुरू होता एमडी ड्रग्जचा कारखाना

कराड: सातारा जिल्ह्यात ड्रग्ज माफियांनी आपली पाळेमुळे किती खोलवर रोवली आहेत, याचा धक्कादायक पर्दाफाश पुन्हा एकदा झाला आहे. कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (DRI) धाड टाकत एमडी ड्रग्ज तयार करणारा एक मोठा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण काळा उद्योग एका निर्जन ठिकाणी असलेल्या कोंबड्यांच्या शेडमध्ये सुरू होता.

कोंबड्यांच्या शेडमध्ये ड्रग्ज निर्मिती

मिळालेल्या माहितीनुसार, पाचुपतेवाडी येथील एका निर्जन परिसरात जानेवारी महिन्यापासून एमडी ड्रग्जची निर्मिती सुरू होती. याबाबतची गोपनीय माहिती डीआरआयला मिळाल्यानंतर अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. या धाडीत रेकॉर्डवरील गुन्हेगार बाबा मोरे याच्यासह एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

७ ते ८ कोटींचा तयार माल जप्त

या कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे ७ ते ८ कोटी रुपयांचा तयार एमडी ड्रग्जचा साठा तसेच मोठ्या प्रमाणात कच्चा माल, रसायने आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री जप्त केली आहे. तपास यंत्रणेला घटनास्थळी आढळलेल्या साहित्याचे प्रमाण पाहून मोठा धक्का बसला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात हजारो कोटींची उलाढाल शक्य होती

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या कच्च्या मालापासून जर संपूर्ण ड्रग्ज तयार झाले असते, तर त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असती. मात्र, डीआरआयच्या पथकाने वेळेत कारवाई करत हा मोठा कट उधळून लावला.

स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून कारवाई

या कारवाईचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे, इतकी मोठी धाड पडत असताना सातारा किंवा कराड पोलिसांना याची पुसटशीही माहिती नव्हती. हे पथक थेट गुजरात आणि हैदराबाद येथून आले असल्याची माहिती आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, तपासाची गोपनीयता राखण्यासाठी स्थानिक यंत्रणेला दूर ठेवण्यात आले असावे, अशी चर्चा आहे.

महिन्याभरातील दुसरी मोठी कारवाई

सातारा जिल्ह्यातील अमली पदार्थविरोधी ही महिन्याभरातील दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करून ड्रग्ज जप्त केले होते. आता कराडमध्ये थेट ड्रग्ज तयार करणारा कारखानाच उद्ध्वस्त करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी डीआरआय विभागाकडून अद्याप अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नसून, पुढील तपास सुरू आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago