मुख्य बातम्या

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या विविध कार्यांच्या माध्यमातून केलेल्या कामात आलेल्या अनुभवांतून लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ या पुस्तकाचे रविवारी (ता. ३०) प्रकाशन करण्यात आले. ईश्वरी प्रकाशन, पुणे यांच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे, माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंतराव गिरी, राहुल देशमुख, विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता नितीन महाजन, जुन्नर शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन अन्वर सय्यद, रुक्साना सय्यद, दस्तगीर शेख, उद्योजक पै. गणेश लोखंडे, डॉ. हेमंत दातखिळे, लेखक संतोष धायबर, सचिन बेंडभर, मनोहर परदेशी, राहुल चातुर, संजीव मांढरे, विठ्ठल वळसे पाटील, संभाजी गोरडे, आकाश भोरडे, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, जितेंद्रकुमार थिटे, नागनाथ शिंगाडे, प्रवीणकुमार जगताप, एन. बी. मुल्ला, प्रकाश चव्हाण, जालिंदर आदक, शंकर पाबळे, मंदार तकटे, सचिन धुमाळ, भगवान खुर्पे, मिलिंद देवरे, अनिल जगताप, लखन शिरसकर, अतुल थोरवे, राहुल गायकवाड, वैभव निकाळजे, विक्रम दुपारगुडे, रुपेश बोरुडे यांसह आदी उपस्थित होते.

आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक अनुभवातून माणूस काहीतरी शिकून मोठा होत असतो आणि माणसाला आलेल्या अनुभवांचा इतर लोकांना फायदा होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी व्यक्त केले. नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक असल्याचे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंतराव गिरी, राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणकुमार जगताप व एन. बी. मुल्ला यांनी केले तर प्रास्ताविक लेखक शेरखान शेख यांनी केले आणि श्रीकांत भाडळे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

3 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

11 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago